

Civil Infrastructure Boost: ZP Pune Pledges Dynamic Funds for Uruli Kanchan Solid Waste Project
sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन : जिल्हा परिषदेच्या वतीने उरुळी कांचन येथील कचरा निर्मूलन समस्या फार गंभीर आहे.त्यासाठी अत्याधुनिक घनकचरा निर्मुलन प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी जिल्हा परिषद पुणे भरघोस मदत करण्यास तयार आहे,मात्र त्यामध्ये लोकसहभाग आणि जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उरुळी कांचन गावाची राहील.जागा उपलब्ध करून दिल्यास एक महिन्याच्या आत मंजुरी व निधी देण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल (बाबा) जगदाळे यांनी दिले.