

Large-Scale Health Camp in Soratapwadi
sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : मोठ्या स्वरूपातील आरोग्य शिबिर प्रथमच पूर्व हवेलीच्या ग्रामीण भागात होत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी पाहता ग्रामीण भागात आरोग्य समस्या किती मोठ्या प्रमाणात आहेत हे दिसत आहे,त्यासाठी आरोग्य सेवा अधिक व्यापक होणे गरजेचे झाले आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी केले,ते बळीराजा महाआरोग्य शिबिराचे उदघाटन करताना बोलत होते.