Urali Kanchan News : रस्ते आहेत की पार्किंग? उरुळी कांचनच्या अंतर्गत रस्त्यांचे झाले 'तुकडे'; लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर जनतेचा संताप.

उरुळी कांचनमध्ये अंतर्गत रस्त्यांवरील वाढती अतिक्रमणे आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासिनतेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
Persistent Traffic Jams Due to Illegal Encroachments in Uruli Kanchan

उरुळी कांचन येथील आश्रम रस्त्यावर नित्य होणारी वाहतूक कोंडी

sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : उरुळी कांचन गावातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्ण बेशिस्त झाली असून त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने गावातील सर्वसामान्य जनता व पंचक्रोशीतून येणारे नागरिक,व्यापारी,महिला,विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले असुन वाहतुकीची कोंडी, रस्त्यात होणारे अस्तव्यस्त अवैध पार्किंग सेवा रस्त्यावरील व गावातील अंतर्गत रस्त्यांवरील टपऱ्यांचे,हातगाड्यांचे,भाजी,फळ विक्रेते यांचे अतिक्रमण तसेच ओढ्यावरील व सार्वजनिक जागांवरील विनापरवानगी वाढणारे बांधकाम,अतिक्रमण ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून नजरेआड होत आहे.नेमकी अर्थपूर्ण तडजोडीतून कारवाई केली जात नाही का ? कारवाई करण्याची हिम्मत होत नाही असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com