The tournament aimed to encourage rural youth to pursue chess and prepare for higher-level national and international competitions.
sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन : ५ जुलै २०२६ रोजी उरुळी कांचन येथे युवान ग्रुपच्या माध्यमातून "सरपंच चषक बुद्धिबळ स्पर्धा" संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.ग्रामीण भागातील युवा खेळाडूंची बौद्धिक खेळाकडे कल वाढावा व ऑलंपिक स्पर्धेत देखील भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदकांची कमाई करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी त्यांना सराव म्हणून अशा स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्याचा आमच्या संस्थेचा भविष्यातील प्रयत्न आहे असे युवानचे प्रमुख राष्ट्रीय बुद्धिबळ पटू युवराज दनाने यांनी यावेळी सांगितले.स्पर्धेत वेगवेगळ्या गटातून पुढील स्पर्धकांनी बक्षीसे पटकावली.