वडी येथील उरुसाला आज पासून सुरवात.
वडीत उरसाला आजपासून सुरुवात
औंध, ता. ७ : वडी (ता. खटाव) येथील पीर हजरत लाडलेमशायक हजरत अन्सारी यांच्या उरसाला उद्यापासून (रविवार) सुरुवात होत असून, उरसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
हिंदू- मुस्लिम ऐक्याची परंपरा असलेल्या उरसाची धार्मिक विश्वात ख्याती आहे. उरसानिमित्त सासरी गेलेल्या माहेरवाशीण महिला आवर्जून हजेरी लावतात. उरसाच्या मुख्य दिवशी श्रद्धेने उपवास ठेवतात. पिराचे मूळ ठिकाण असलेल्या आलन (कर्नाटक) येथून संदल आणण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी वाजत गाजत दर्ग्यात ग्रामस्थांच्या उपस्थितीत संदल आणि गलेफ चढवण्यात येणार आहे, तसेच सायंकाळी मिलादचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता. ९) उरसाचा मुख्य दिवस असून, दिवसभर श्रद्धेने उपवास केलेल्या माहेरवाशीण महिला सायंकाळी पिराचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. यावेळी भक्तीने फुलांच्या माळा, नारळाची तोरणे अर्पण करतात. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. रात्री मनोरंजनासाठी आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता झेंड्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर भाविकांना ग्रामस्थांचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उरुस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

