व्यापार करार म्हणजे फाशीचा दोर : रमेश
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २२ : अमेरिकेसोबत करण्यात आलेला व्यापार करार हा शेतकऱ्यांच्या गळ्यात टाकण्यात आलेल्या फाशीच्या दोरीसारखा असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यायचा होता तर व्यापार करार करण्याची गडबड कशासाठी करण्यात आली, असा सवालही रमेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती करत होते, तर त्याचवेळी ट्रम्प हे भारतावरील आयात शुल्कात वाढ करत होते, असा टोला रमेश यांनी मारला. ते म्हणाले,‘‘व्यापार करार समान तत्त्वावर व्हावयास हवा होता. घेण्या-देण्याचा अर्थ केवळ भारत देत राहील आणि घेणार काहीच नाही, असा होत नाही. व्यापार करार संतुलित नसून तो एकतर्फी आहे. देशातील शेतकऱ्यांवर याचा परिणाम पडणार आहे. मका, कापूस, सोयाबीन, सफरचंद आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा करार मारक ठरू शकतो. महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचे शेतकरी या करारामुळे प्रभावित होणार नाहीत का, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे.’’
अमेरिकेने भारतावर लादलेला कर १८ टक्क्यांवरुन १० टक्क्यांपर्यंत कमी झाला असेल तर भारतीय कृषी उत्पादनांवर लावलेला कर कमी करण्याची मागणी सरकार करणार आहे का? रशियाकडून तेलाची खरेदी करण्याबाबतच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी केलेली विधाने आणि भारताकडून दिले जात असलेले संकेत यात अंतर आहे. यासंदर्भात वास्तविकता काय आहे, हेही स्पष्ट झाले पाहिजे, अशीही मागणी रमेश यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

