अमेरिकेकडे डोमचे संरक्षणच नाही

अमेरिकेकडे डोमचे संरक्षणच नाही
Published on

न्यूयॉर्क, ता.२८ (वृत्तसंस्था) ः आखाती युद्धाचा भडका उडाला असताना अमेरिकी लष्करी सामर्थ्याचे पितळ जगासमोर उघडे पडले आहे. रशिया आणि चीनसारख्या पारंपरिक शत्रू राष्ट्रांकडे असलेली स्वनातीत आणि प्रगत अशी क्रूझ क्षेपणास्त्रे रोखू शकणारी कोणतीही प्रभावी यंत्रणा आपल्याकडे नसल्याची कबुली पेंटॅगॉनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संसदीय समितीसमोर दिली आहे.
अंतराळ धोरण विभागाचे साहाय्यक युद्ध सचिव मार्क बर्कोविट्झ यांनी अमेरिकी सिनेटमध्ये ही माहिती दिली. सध्या अमेरिका शत्रू राष्ट्रांच्या क्षेपणास्त्रांना रोखू शकणाऱ्या गोल्डन डोमची निर्मिती करत आहे पण ही यंत्रणा प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी बराच कालावधी जाऊ द्यावा लागेल, असे सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीसमोरील सुनावणीमध्ये सांगण्यात आले आहे.


- अमेरिकेकडे सध्या जमिनीवर आधारित एकस्तरीय संरक्षण यंत्रणा आहे. उत्तर कोरियासारख्या देशांकडून होणाऱ्या छोट्या हल्ल्यांना रोखण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यात आली होती. प्रतिस्पर्धी देशांचे लष्करी सामर्थ्य वाढत असल्याने अमेरिका गोल्डन डोमसाठी प्रयत्नशील आहे. या प्रकल्पासाठी १७५ ते १८५ अब्ज डॉलर एवढा खर्च अपेक्षित आहे.

- एआय-आधारित कमांड सिस्टिम, जमीन, पाणी, हवा आणि अवकाशातील इंटरसेप्टर आणि सेन्सरचा या डोममध्ये समावेश असेल. ‘गोल्डन डोम’चे प्रमुख आणि स्पेस फोर्सचे जनरल मायकेल गुएटलेन यांनी सांगितले की, ही यंत्रणा २०२८ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी २०३० पर्यंत १८५ अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित आहे.


कोट
सध्याची परिस्थिती शीतयुद्धाच्या काळापेक्षा अधिक गुंतागुंतीची आहे. प्रगत क्षेपणास्त्रांची मारक क्षमता असलेले अनेक अण्वस्त्रसज्ज प्रतिस्पर्धी सध्या रिंगणात आहेत.
- मार्क बर्कोविट्झ, युद्ध सचिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com