पुणेरी वंशाच्या विद्यार्थ्याला युएस प्रेसिडेंशीयल मेडल

मुळचे पुण्याचे पण मागील २२ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रीतम आणि पल्लवी बम्ब यांच्या १७ वर्षाच्या मुलाने पुणेकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.
Siddha Bumb
Siddha BumbSakal
Updated on
Summary

मुळचे पुण्याचे पण मागील २२ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रीतम आणि पल्लवी बम्ब यांच्या १७ वर्षाच्या मुलाने पुणेकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.

पुणे - मुळचे पुण्याचे पण मागील २२ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रीतम आणि पल्लवी बम्ब यांच्या १७ वर्षाच्या मुलाने पुणेकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. बारावीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या सिद्ध बम्बला अमेरिकेच्या प्रतिष्ठीत ‘युएस प्रेसिडेंशीयल स्कॉलर मेडल’ने सन्मान करण्यात आला आहे. अमेरिकेतील ३७ लाख कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतील सर्वोत्कृष्ट १६१ विद्यार्थ्यांमध्ये सिद्धचा समावेश झाला आहे.

नुकतेच टेक्सास विद्यापीठाच्या ऑस्टिन कॅम्पसमधून सिद्धने बारावीत संगणक विज्ञानाचे शिक्षण पूर्ण केले आहे. पुढील पदवीच्या प्रवेशासाठी त्याने एसएटी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले आहे. सिद्धप्रमाणेच अमेरिकेतील अशा दोन हजार ४०० विद्यार्थ्यांची पुढच्या फेरीसाठी निवड झाली होती. त्यांच्यामध्ये बाजी मारत अंतिम फेरीत सिद्धने हे पदक पटकावीले. शैक्षणिक कामगिरीबरोबरच, यश, कलात्मकता, नेतृत्व क्षमता, सामाजिक उत्तरदायित्व आणि व्यक्तिमत्त्वातील गुणांच्या आधारे सिद्धची या पदकासाठी निवड झाली. टेक्सास राज्यातून निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांमध्ये सिद्धचा सामावेश आहे. सिद्धची आई पल्लवी भटेवरा-बम्ब सांगतात, ‘अभ्यासाबरोबरच सिद्धला सामाजिक कार्याची आवड पहिल्यापासून आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम तो राबवीत असतो. त्याच्या अभ्यासातील प्रगतीबरोबरच व्यक्तीमत्त्व विकासाकडे आमचे लक्ष आहे. त्याच्या आजच्या यशात शिक्षकांचाही मोठा वाटा आहे.’ अमेरिकेतील प्रज्ञावान विद्यार्थी समूहात सिद्धला प्रवेश मिळाला आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही त्याच्याशी संवाद साधणार आहे. पुढील शिक्षणासाठी फ्री-शीप आणि शैक्षणिक मार्गदर्शन सिद्धला मिळणार आहे. जैवमाहितीशासास्रात पदवी शिक्षणाबरोबरच संशोधन करण्याचा मानस सिद्धने सकाळशी बोलून दाखविला.

सिद्धचे सामाजिक उपक्रम

- बॉईज स्काऊट्स ऑफ अमेरिका या छात्र दलात इगल स्काऊटचा दर्जा

- माध्यमिक विद्यालयात शिकताना शाश्वत घनकचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापराचा प्रकल्प राबविला

- अमेरिका साऊथ एशियन एन्ड ऑस्टिन टेक इनिशिएटीव्हची (साथी) स्थापना करत अमेरिकेसह भारतातील गरजू विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉपचे दान मिळविले

- ज्या घरांतील पहिलीच व्यक्ती शिक्षण घेत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी संगणक विज्ञानाचा अभ्यासक्रम

आपल्या वेळचे महत्‍त्व ओळखून त्याचे योग्य नियोजन करायला हवे. अभ्यासाबरोबरच व्यक्तीमत्त्व विकास, सामाजिक उत्तरदायित्व आणि जीवनाचे इतर पैलू प्रगल्भ करणाऱ्या उपक्रमांनाही योग्य वेळ देता आला पाहिजे.

- सिद्ध बम्ब, युएस प्रेसिडेंशीयल मेडल प्राप्त विद्यार्थी

प्रत्येक मुलाला स्वतःची एक विशेषता असते. त्याच्यामध्ये दडलेल्या याच ‘स्पार्क’ला ऊर्जा मिळायला हवी. म्हणून पूरक वातावरणाबरोबरच आवश्यक सुविधाही त्याला द्यायला हवा. केवळ अभ्यासच सर्व नाही, तर सामाजिक भान आणि अंगभूत विकासही महत्त्वपूर्ण आहे.

- प्रीतम-पल्लवी बम्ब, सिद्धचे पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune citizens can now suggest development projects for the PMC's 2027–28 Budget. Proposals can be submitted until August 31.
Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.
Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com