वकिलांनो, 'असा' करा घरबसल्या दावा दाखल; जिल्हा न्यायालयाने केले आवाहन

सनील गाडेकर
गुरुवार, 9 जुलै 2020

ई - फाइलिंग कशा प्रकारे करावे याची माहिती www. ecourts.gov.in या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. ई-फायलिंग करताना वकिलांना एकदाच नोंदणी करावी लागते. लॉकडाऊन सध्या काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. 

पुणे- कोरोना काळात न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी तसेच न्यायपालिकेचे काम अद्ययावतपणे चालावे यासाठी वकिलांनी प्रत्यक्ष न्यायालयात जावून दावा दाखल करण्यापेक्षा तो ऑनलाइन पद्धतीने दाखल करावा, असे आवाहन जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून वकिलांना करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोविड-19 चा संसर्ग वाढू नये व तात्काळ प्रकरणांवर सुनावणी व्हावी म्हणून न्यायालयाचे कामकाज सध्या एका शिफ्टमध्ये सुरू आहे. मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू असल्याने वकिलांनी 'ई-फायलिंग' सुविधेचा वापर करावा, असा आशयाचे पत्रक प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे. ई - फाइलिंग कशा प्रकारे करावे याची माहिती www. ecourts.gov.in या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. ई-फायलिंग करताना वकिलांना एकदाच नोंदणी करावी लागते. लॉकडाऊन सध्या काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयात पक्षकार आणि वकिलांची गर्दी वाढली होती. गर्दी आटोक्यात आणून कोरोनाना संसर्ग रोखण्यासाठी सध्या न्यायालयाचे कामकाज एका शिफ्टमध्ये चालविण्यात येते आहे. या काळात तातडीच्या आणि जामिनाच्या दाव्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दी आणखी कमी करण्यासाठी वकिलांनी इ - फायलिंग सुविधेचा वापर करावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा करा दावा दाखल : 
 efiling.ecourts.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने वकील दावे दाखल करू शकतात. या वेबसाईटवर नोंदणी करून ई-फायलिंग सुविधेचा फायदा कसा घ्यायचा सर्व माहिती आहे. फायलिंग करताना काही अडचण आली तर त्याबाबत विचारणा करण्यासाठी राज्यनिहाय संपर्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Edited By - Kalyan Bhalerao


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use e-filing to file an appeal claim to lawyers from the district court