

उत्रौली, ता. १८ : उत्रौली (ता. भोर) येथे रविवारी (ता. १७) शासकीय सेवेत विविध पदांवर निवड झालेल्या गावातील सहा गुणवंत तरुणांचा ग्रामस्थांच्या वतीने गुलालाच्या उधळणीत आणि वाजतगाजत भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामदैवत सोनारसिद्ध भैरवनाथ मंदिरापर्यंत डीजे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी सत्कारार्थींचे औक्षण केले. मंत्रालय सहाय्यक पदी निवड झालेली ऋतुजा लेकावळे, तसेच पोलिस दलात भरती झालेले ओम शिंदे, हृषीकेश साळुंके, प्रथमेश शिवतरे, रोहित किर्वे यांचे वडील शिवाजी किर्वे आणि हृषीकेश वीर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
तंटामुक्ती अध्यक्ष भरत शिवतरे, उपाध्यक्ष अशोक शिवतरे, माजी सरपंच भगवान शिवतरे, नवनाथ शेटे, सेवानिवृत्त प्राचार्य दीपक शिवतरे आदींच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महेश शिवतरे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.