Pune Utsavnama : ‘उत्सवनामा’च्या साडी महोत्सवाला जोडीनेच यायचं!

अहो, ऑफिसची आणि बाहेरची सगळी कामं लवकर संपवून बुधवारी (ता. ८) घरी वेळेत या. अहो, का म्हणून काय विचारताय? काय ठरलंय आपलं? विसरलात? अहो, ‘उत्सवनामा’मध्ये जायचंय.
Utsavnama
UtsavnamaSakal

पुणे - अहो, ऑफिसची आणि बाहेरची सगळी कामं लवकर संपवून बुधवारी (ता. ८) घरी वेळेत या. अहो, का म्हणून काय विचारताय? काय ठरलंय आपलं? विसरलात? अहो, ‘उत्सवनामा’मध्ये जायचंय. साड्या खरेदी करायला. तब्बल अडीच ते तीन हजार साड्या तेथे असतील.

‘सकाळ’च्या ‘सरकारनामा’ वेब पोर्टलने आयोजित केलेल्या या महोत्सवाला खास मंत्री, माजी मंत्री, आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक, पदाधिकारी आपापल्या ‘होम मिनिस्टर’ना घेऊन येणार आहेत. मग आपणही जायचंच... हा उत्सव म्हणजे आपल्यासाठी स्नेहमेळावाच आहे.

दिवाळीनिमित्ताने आयोजित ‘उत्सवनामा’ साडी महोत्सवात ‘स्नुषा’, ‘योशा’ शो-रूममधील भारी-भारी साड्या आहेत. काही जणींनी तर ठरवलंय म्हणे, चेक्सवाली पैठणीच घ्यायची. तसं मला, आंबा कलरची एक साडी पण घ्यायचीच आहे. अहो, नाही खिसा हलका करणार तुमचा. उत्सवनामातील साड्या कंपनी रेटमध्येच मिळणार आहेत.

तिथं शालू, पैठणी, बनारसी, नारायणपेठी, पेशवाई, कांजीवरम, डोला सिल्क, कॉटन सिल्क, बांधणी, जॉर्जेट, शिफॉन, पटोला, गढवाल... एकाहून एक भारी व्हरायटी असतील. कधीतरीच हट्ट करते ना हो मी? ऐकावं कधीतरी बायकोचं. फायद्यात पडतो सौदा. आणि हो, तुमच्या बहिणीला केला होता फोन. ती पण येणार आहे नवऱ्याला घेऊन. मला पाडव्याची आणि तिला भाऊबिजेची साडी एकाच ठिकाणी घेऊन टाका ना.

Utsavnama
Pune Municipal : समाविष्ट २३ गावांतील सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५३० कोटींचे कर्ज

अहो, ‘उत्सवनामा’मध्ये दिवाळीची साडी खरेदी करणं अनेक दृष्टींनी फायद्याचं आहे. व्हरायटीसाठी फिरत बसायला नको, क्वालिटीची फिकीर नको, आवडता रंगच मिळाला नाही, आवडतं डिझाईनच मिळालं नाही याची रुखरुख लागायला नको. तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही वेळेत यायचंय आणि थेट आपण ‘उत्सवनामा’ जायचं.

महोत्सवाविषयी...

कधी - बुधवारी (ता. ८)

कुठे - सरकारनामा कार्यालय, एसआयआयएलसी मीडिया सेंटर,

सकाळनगर गेट नं. १, बाणेर रोड, पुणे ४११००७.

वेळ - दुपारी तीन ते रात्री १० पर्यंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com