Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी सर्व पशुधनाचे लसीकरण करा - तुकाराम मुंडे

पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांचा आदेश ः टास्क फोर्सची बैठक
Vaccinate all Livestock for lumpy skin prevention tukaram munde animal health care
Vaccinate all Livestock for lumpy skin prevention tukaram munde animal health caresakal

पुणे : राज्यात आतापर्यंत ७ हजार ३४१ पशूधन हे लम्पी स्कीन आजाराने बाधित झाले आहे. त्यामुळे या आजाराच्या प्रतिबंधासाठी सर्व पशुधनाचे लसीकरण तातडीने पूर्ण करा आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोवर्गीय पशुधनावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असा आदेश राज्याचे पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांनी गुरुवारी (ता.१७) पुण्यात एका बैठकीत बोलताना पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना दिला.

लम्पी स्कीन आजाराचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची बैठक आज झाली. या बैठकीत मुंडे बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर,

अतिरिक्त आयुक्त शीतलकुमार मुकणे, बेंगळुरू येथील राष्ट्रीय पशू साथरोग शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान (निवेदी) संस्थेच्या डॉ. मंजुनाथ रेड्डी, ‘माफसू’चे संशोधक संचालक डॉ. नितीन कुरकुरे, विस्तार संचालक अनिल बिकाने, विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि संशोधक उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. सद्यःस्थितीत या आजाराने बाधित असलेल्या ७ हजार ३४१ पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील सर्व पशुधनाचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यासाठी वेगाने प्रयत्न करा. पशुधन आजारी पडू नये, यासाठी ग्रामपंचायतींच्या मदतीने गाव पातळीवर जनजागृती मेळावे घेण्यात यावेत. आजारी पशुधनाला अन्य जनावरांपासून दूर ठेवावे आदी सूचना मुंडे यांनी या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

‘लम्पी स्कीन’वरील उपाययोजना

- गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करा

- पावसाळ्यात गोठ्याच्या परिसरात पाणी न साठण्याची खबरदारी घ्या

- आपापले गाव. गोठा आणि परिसरात सातत्याने कीटकनाशकांची फवारणी करा

- गाय, बैलांना अशक्तपणा, ताप आल्यास तातडीने उपचार करा

- उपचारासाठी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्या

- आजारी पशुधनाला अन्य पशुधनापासून लांबच्या अंतरावर ठेवा

- गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com