पुणे शहरात आज २०० ठिकाणी लसीकरण; जाणून घ्या कोठे मिळणार कोणता डोस

पुणे महापालिकेला शासनाकडून २८ हजार ९०० डोस मिळाले आहेत. हा साठा केवळ एकच दिवस पुरेल एवढा आहे.
Covishield and Covaxin
Covishield and CovaxinSakal
Updated on

पुणे - शासनाकडून महापालिकेला (Municipal) २८ हजार ९०० डोस (Dose) मिळाले आहेत. हा साठा केवळ एकच दिवस पुरेल एवढा आहे. आज (शनिवारी) १९४ ठिकाणी कोव्हीशील्ड (Covishield) व ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे (Covaxin) लसीकरण (Vaccination) होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. (Vaccination 200 Places in Pune Today Find Out Where to Get What Dose)

आज महापालिकेला शासनाकडून २१ हजार कोव्हीशील्ड आणि ७ हजार ९०० कोव्हॅक्सीनचे डोस मिळाले आहेत.

कोव्हीशील्डचा साठा हा एक दिवस पुरेल एवढाच आहे. त्यामुळे शनिवारी लस संपल्यानंतर शासनाकडून रविवारी लस उपलब्ध झाली तर सोमवारी शहरात पुन्हा लसीकरण होईल, अन्यथा लस मिळे पर्यंत केंद्र बंद असतील, असे महापालिकेने सांगितले आहे. मात्र, कोव्हॅक्सीनचे केवळ ६ केंद्र असून, रोज १८०० डोस वापरले जात आहेत, त्यामुळे कोव्हॅक्सीनचे केंद्र पुढील आठवड्यात सुरू राहणार आहेत.

Covishield and Covaxin
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ थांबविण्यासाठी समिती स्थापन न केल्यास दंड

कोव्हीशील्ड

- पहिल्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (३० एप्रिल) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस ऑनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन

- ६ केंद्रांवर प्रत्येकी ३०० डोस

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

- २५ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com