esakal | Pune : बुधवारी शहरात १९६ ठिकाणी लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Covishield Vaccine

Pune : बुधवारी शहरात १९६ ठिकाणी लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेतर्फे उद्या (बुधवारी) शहरात १९६ ठिकाणी लसीकरण होणार आहे. यामध्ये १८५ ठिकाणी कोव्हीशील्ड तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सीन लस उपलब्ध असणार आहे.

शासनाकडून पुणे शहरासाठी कोव्हीशील्डचे ९० हजार तर कोव्हॅक्सीनचे ६ हजार डोस उपलब्ध झाले होते. मंगळवारी यापैकी निम्मी लस वाटप केली होती. उर्वरित लस आज केंद्रांना पुरविण्यात आली आहे. कोव्हीशील्डचे १८५ केंद्रांवर प्रत्येकी १६० डोस पुरविण्यात आले आहेत. तर कोव्हॅक्सिनच्या ११ केंद्रावर प्रत्येकी १४० डोस उपलब्ध केला केले आहेत, असे प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा: तिसरी लाट येत नाहीए तर कधीच आलीए - मुंबई महापौर

कोव्हिशिल्ड

  • पहिल्या डोससाठी १५ टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

  • पहिल्या डोससाठी १५ टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

  • पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (१५जून) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी ३५ टक्के लस ऑनलाइन

  • थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी ३५ टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सिन

  • पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी १५ टक्के लस

  • पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी १५ टक्के लस

  • ११ आॅगस्ट पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्यांना दुसऱ्या डोससाठी ३५ टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

  • दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी ३५ टक्के लस उपलब्ध

loading image
go to top