Sakal Impact : किरकटवाडी येथे पोलिस बंदोबस्तात लसीकरण;राजकीय पुढाऱ्यांना 'नो एन्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Impact : किरकटवाडी येथे पोलिस बंदोबस्तात लसीकरण

Sakal Impact : किरकटवाडी येथे पोलिस बंदोबस्तात लसीकरण

किरकटवाडी(pune): खडकवासला(Khadakwasla) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या लसीकरण(vaccination) केंद्रांवर नियोजनाअभावी व राजकीय हस्तक्षेपामुळे गोंधळ झाला होता. नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबतचे वृत्त 'सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात 270 ज्येष्ठ नागरिकांनी किरकटवाडी येथील लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतला.(Vaccination at Kirkatwadi under police protection)

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरकटवाडी, खडकवासला व नांदेड या लसिकरण केंद्रांवर नियोजनाअभावी ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती.तासंतास रांगेत थांबूनही अनेकांना लस न घेताच माघारी जावे लागत होते.त्यातच राजकीय पुढारी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या लसिकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर अरेरावी करत असल्याने गोंधळात अधिकच भर पडत होती.

हेही वाचा: लसीकरण ऑनलाइन नोंदणीत घोळ

दै.'सकाळ'ने याबाबत आरोग्य, पोलिस व ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने आदेश जारी करुन लसीकरण केंद्रांसाठी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार लसीकरण केंद्रावर किरकटवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गोंधळ टाळण्यासाठी नागरिक लस घेण्यासाठी रांगेत येतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ वंदना गवळी, डॉ बाळासाहेब आहेर, होमगार्ड जवान भालचंद्र ननावरे, सुशिल गाभणे, मयुर शहाणे, प्रथमेश मालुसरे, किरकटवाडी ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी लसीकरण सुरळीत होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.

राजकीय पुढाऱ्यांना 'नो एन्ट्री'.......

राजकीय पुढाऱ्यांमुळे गोंधळ होत असल्याने व लसिकरणात अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या आदेशानुसार लसीकरण केंद्रावर राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पोलिसांनी एकाही राजकीय पदाधिकाऱ्याला गेटच्या आत येऊ दिले नाही.त्यामुळे लसिकरण प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडत असल्याचे दिसून आले.

"आज अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आली होती. पहिला डोस घेतला तेव्हा खुप गोंधळ होता परंतु आज नागरिकांची संख्या जास्त असूनही नियोजन असल्यामुळे काही वाटले नाही.बैठक व्यवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय झाली."

- अरुण सोनवणे, लसीकरणासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक.

"लसीकरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगली मदत होत आहे. किरकटवाडी ग्रामपंचायतीनेही योग्य नियोजन केले. खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या चारही लसिकरण केंद्रांवर यापुढे याप्रमाणेच नियोजन करण्यात येणार आहे.यात नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे."

- डॉ. वंदना गवळी, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी.

पुण्यातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: Vaccination At Kirkatwadi Under Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top