पुणे : लसीचा पुरवठा न झाल्याने लसीकरण मोहीम ठप्प

केंद्र सरकार तर्फे महापालिकेला गेल्या आठवड्यात फक्त १४ कोव्हीशील्डचे डोस मिळालेले होते.
Covishield Vaccine
Covishield VaccineSakal
Updated on

पुणे - गेल्या आठवडाभरापासून महापालिकेला (Municipal) कोव्हीशील्ड लसीचा (Covishield) पुरवठा न झाल्याने लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) ठप्प आहे. पहिल्या तसेच दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत असलेले नागरिक मोफत लस मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. उद्या (गुरूवारी) शहरात ६ ठिकाणी कोव्हॅक्सीन लस (Covaxin Vaccine) उपलब्ध असणार आहे.

केंद्र सरकार तर्फे महापालिकेला गेल्या आठवड्यात फक्त १४ कोव्हीशील्डचे डोस मिळालेले होते. त्याद्वारे बुधवारी मोहीम राबविण्यात आली. यानंतर महापालिकेला कोव्हीशील्ड लसीचे डोस मिळालेले नाहीत.

Covishield Vaccine
रेल्वेच्या सहायक फौजदारांवर दरोडेखोरांकडून हल्ला

शहरात आत्तापर्यंत सुमारे २६ लाख २६ हजार ३५ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. तर त्यापैकी १९ लाख २९ हजार ६८९ जणांचा पहिला तर, ६ लाख ९६ हजार ३७६ जणांचे दोन्ही डोस झाले आहेत. अद्यापही जवळपास १४ लाख जणांचा एकही डोस झालेला नाही. महापालिकेची लस उपलब्ध होत नसल्याने काही नागरिकांनी नाईलाजास्तव खासगी दवाखान्यांमध्ये जाऊन लस घ्यावी लागत आहे.

शहरात झोपडपट्टी भागातील नागरिकांना अद्यापही लसीकरणात प्रतिसाद दिलेला नाही. त्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम सुद्धा हाती घेतली. मात्र, सरकारतर्फे पुरेसा प्रमाणात लस मिळत नसल्याने गेल्या आठवडाभरापासून लसीकरण ठप्प आहे. महापालिकेकडे कोव्हॅक्सीन लस शिल्लक आहे. त्याद्वारे ७ केंद्रावर प्रत्येकी ३०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. कोव्हीशील्ड लस कधी उपलब्ध होणार याची काही माहिती नसल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.