पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण रहाणार ठप्प

केंद्र व राज्य शासनाकडून पुणे महापालिकेला लस उपलब्ध झालेली नसल्याने उद्या (मंगळवारी) शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद असणार आहेत.
Corona Vaccination
Corona VaccinationSakal

पुणे - केंद्र व राज्य शासनाकडून (State Government) पुणे महापालिकेला (Pune Municipal) लस (Vaccination) उपलब्ध झालेली नसल्याने उद्या (मंगळवारी) शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद (Close) असणार आहेत. सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण ठप्प असल्याने दुसऱ्या डोससाठी (Dose) प्रयत्न करणारे नागरिक हवालदिल झाले आहेत. (Vaccination will be halted due to non availability of vaccine in Pune)

महापालिकेला ११ मे रोजी कोव्हीशील्डचे २८ हजार तर १३ मे रोजी कोव्हॅक्सीनचे ३ हजार डोस शासनाकडून मिळाले होते. महापालिकेने दुसऱ्या डोसच्या नागरिकांना प्राधान्य देत या ३१ हजार डोसचे वितरण केल्याने ही लस संपली आहे.

रविवारी (ता. १६) लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा महापालिकेला होती, पण लस न आल्याने आज (सोमवारी) लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले आहेत. तसेच आज देखील लस उपलब्ध न झाल्याने मंगळवारी देखील लसीकरण केंद्रांना टाळे असणार आहे.

Corona Vaccination
पुणे शहरात वादळीवारा व पावसामुळे दोन दिवसात 55 झाडे कोसळली

केंद्र सरकारने कोव्हीशील्ड लसीचा दुसरा डोस १२ ते १६ आठवडे या दरम्यान देण्याचे आदेश दिलेले असल्याने या लसीची मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, कोव्हॅक्सीन लसीचा डोस २८ दिवसानंतरच घ्यावा लागतो. त्यामुळे या लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी पात्र झालेले ज्येष्ठ नागरिक महापालिकेचे अधिकारी, डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचारी यांच्याकडे दुसरा डोस कधी मिळणार याबाबत चौकशी करत आहेत. अनेक जण २८ दिवस उलटून गेले तरी लस न मिळत नसल्याने फोन करून संताप व्यक्त करत आहेत.

शहरातील कोव्हॅक्सीन लसीची स्थिती

गट - पहिला डोस - दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी - ३७२५ - २५१३

फ्रंटलाइन कर्मचारी - ३७८८ - १९८३

ज्येष्ठ नागरिक - ३८६६२ -२८००८

४५ ते ५९ वयोगट - १११५४ - १०८२५

१८ ते ४४ - ९५१४ - ००००

एकूण - ६६८४३ - ४३३२९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com