कामाच्या ठिकाणी लसीकरणासाठी अधिकारी नियुक्त; पुणे, पिंपरी महापालिकेचा निर्णय

Vaccine
Vaccine

पुणे : उद्योगांतील ४५ वर्षांवरील कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच लसीकरण करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त अनुक्रमे विक्रमकुमार आणि राजेश पाटील यांनी नोडल ऑफिसर नियुक्त करण्याची घोषणा गुरुवारी केली. त्यामुळे ११ एप्रिलपासून शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कामगारांचे लसीकरण  सुरू होणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरतर्फे शहर आणि परिसरातील उद्योजकांची ऑनलाईन बैठक  झाली. त्यात दोन्ही महापालिका आयुक्तांनी कामाच्या ठिकाणी लसीकरणासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी स्वागत करताना स्थनिक प्रशासन आणि रुग्णालयांना कायमच मदत करण्याची चेंबरची भूमिका असल्याचे सांगितले. तसेच कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त कामगारांचे वेगाने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट साध्य केले पाहिजे, असे नमूद केले. महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले, ‘‘कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास अनेक कंपन्या इच्छूक आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनावरील लसीकरणाचा ताण निश्चितच कमी होणार आहे. तसेच लसीकरण करण्यास इच्छूक असलेल्या कंपन्यांचे माहिती चेंबरने संबंधित महापालिक प्रशासनापर्यंत पोचविली अहे.’’लसीकरणाबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आवाहही चेंबरने केले. 

- पिंपरी-चिंचवडमधील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारच्या सूचनांनुसार लसीकरण करण्यास महापालिका तयार आहेत. तसेच या साठी चेंबरने घेतलेल्या पुढाकारबद्दल त्यांनी कौतुक केले. ज्या उद्योगांत १०० पेक्षा जास्त कामगार आहेत, तेथे स्वतंत्र लसीकरण करण्यात येईल. ज्या उद्योगांत शंभरपेक्षा कामगारांची संख्या कमी आहे, तेथे दोन किंवा तीन कंपन्यांनी एकत्र येऊन लसीकरणाचा प्रस्ताव द्यावा, असे आवाहन विक्रमकुमार आणि पाटील यांनी केले. आरटीपीसीआर चाचणी आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करण्यासही महापालिका सहकार्य करेल, असेही त्यांनी नमूद केले. कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यासाठी पुण्यात आशिष अग्रवाल तर, पिंपरी चिंचवडसाठी निळकंठ पोमण यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केल्याचे दोन्ही आयुक्तांनी सांगितले. या बैठकीसाठी सुमारे ३०० हून अधिक उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दर १५ दिवसांनी चाचण्या बंधनकारक
उद्योगांतील ४५ वर्षांच्या आतील कामगारांची दर १५दिवसांनी आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन टेस्ट  करण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. त्या बद्दल अनेक उद्योगांच्या प्रतिनिधींनी नापसंती व्यक्त केली. तसेच चेंबरनेही या बाबतच्या नियमात शिथिलता आणायची विनंती केली. त्यावर दोन्ही आयुक्तांनी या बाबतच्या उद्योगांच्या भावना राज्य सरकारकडे मांडल्या जातील, असे स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात चाचण्या कराव्यात, त्यासाठी महापालिका सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच पात्र कंत्राटी कामगारांनाही लसीकरण करण्यात येणार अहे. लसीकरणाची व्यवस्था  संबंधित उद्योगांनी करायची आहे, असेही यावेळी ठरले. 
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
१०० व्हॅंलिटेर प्रदान 
कोरोनामुळे सध्या व्हेंटिलेटरचा पुरवठा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी त्याची टंचाई आहे. हे लक्षात घेऊन पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर) तर्फे ५० व्हॅंटिलेटर सार्वजनिक रुग्णालयांना तर ५० व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना प्रदान करण्यात आले आहेत, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी दिली. व्हेंटिलटरचा सध्या तुटवडा असल्यामुळे पीपीसीआरच्या सदस्यांनी त्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी उभारून हे व्हेंटिलेटर प्रदान केले आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com