
लसीचा दुसरा डोस मिळाला आणि कंपनीच्या दिशेने तो इंटरव्ह्यू साठी धावला!
रामवाडी - आदेश पाचकुडवे (वय 29) हा तरुण आज सकाळी 11 वाजता कात्रजवरुन विमाननगर येथे एका नामांकित कंपनीत इंटरव्ह्यू देण्याकरीता आलेल्या तरुणांला कोरोना लसीकरणचा दुसरा डोस घेतला नसल्याने त्यांना आतमध्ये प्रवेश नाकारला. अशा वेळी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यां कडे केवळ अर्धा तासाची परवानगी घेतली. गुगल सर्च करून वडगावशेरी भागातील मातोश्री मीनाताई ठाकरे रुग्णालयात लसीकरण सेंटर गेले. पण नऊ जण लससाठी आल्या नंतर तुम्हाला लस दिली जाईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. तरुणांला अखेर दीड वाजता लस मिळाली.
सकाळ पत्रकार मॅडम तुमच्या सांगण्यामुळे मला केव्हिशिल्ड चा दुसरा डोस मिळाला. मी आता इंटरव्ह्यू देऊ शकतो असे सांगत आनंदाने विमाननगरच्या दिशेने अखेर त्याने धाव घेतली. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या. अशा वेळी नविन संधी मिळेल याची वाट पाहणारी तरुणाई ज्या कंपनीत काम मिळेल त्या ठिकाणी जाण्याची तयारी मनात ठेवून जात असताना, कोरोना लसीकरण नियमां कडे मात्र पाठ फिरवली जात आहे. मॉल, कंपन्या अशा अनेक ठिकाणी कोरोना लसीकरणचे दोन डोस पुर्ण झालेल्या व्यक्तिना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. साध्या वाटणार्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात याचा अनेकांनी विचार केला पाहिजे. डॉ. श्रध्दा कारंडे यांनी सांगितले.
लस देण्यासाठी केव्हिशिल्ड 10 ml ची बाटली उघडली जाते. ती दोन तासात संपवायची असते. एका बाटलीतून दहा जणांना लसीकरणाचा डोस दिला जात असतो. जो पर्यत 10 जण येत नाही, तोपर्यंत लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना थांबावे लागते.
Web Title: Vaccine Second Dose Youth Company Interview
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..