Siddhesh Raje
sakal
कोंढवा - काही क्षणांपूर्वी सोबत हसणारा, गप्पा मारणारा आणि उद्याच्या परीक्षेची चिंता करणारा मित्र अचानक कायमचा सोडून जाईल, याची कल्पनाही राहुल बोरकरला नव्हती. परीक्षा संपल्यानंतर दोघांनी एकत्र वडापाव खायचा ठरवले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी पेपर असल्याने अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून सिद्धेशनेच राहुलला घरी जाण्यास सांगितले.