

Floodwaters in the Meena River caused extensive crop damage, submerged bridges, and disrupted connectivity across several villages.
Sakal
नारायणगाव : धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्पांतर्गत वडज धरणात 97. 44 टक्के,येडगाव धरणात 87.54 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पूर नियंत्रणासाठी दोन्ही धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. वडज धरणातून मीना नदीत आज सकाळी सहा नंतर अठरा हजार ते वीस हजार क्यूसेक्सने विसर्ग सोडल्याने मीना नदीला मोठा पूर येऊन तालुक्यातील वडज ते नारायणगाव दरम्यानचे बहुतेक पूल पाण्याखाली गेल्याने मीनादीकाठावरील 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला आहे.