

A swarm of aggressive bees attacked mourners during a funeral at Vadgaon Pir, forcing villagers to flee and leaving the body unattended. The last rites were completed two hours later by youths wearing helmets and protective gear.
Sakal
पारगाव : वडगावपीर ता. आंबेगाव येथील पोखरकरमळ्यातील स्मशानभूमीत वृध्द महिलेच्या अंत्यसंस्काराच्यावेळी झाडावरील आग्यामोहाळाच्या मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केल्याने अंत्यसंस्काराशिवाय मृतदेह जागेवरच ठेऊन ग्रामस्थांना पळ काढावा लागला मधमाशांच्या हल्ल्यात सुमारे आठ ते दहा जण जखमी झाले. सुमारे दोन तासानंतर गावातील काही तरुणांनी डोक्यावर हेल्मेट, कानटोपी, हातमोजे तसेच अंगावर पूर्ण कपडे घालून स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार उरकावे लागले.