

वडगाव मावळ, ता. ६ : वडगाव पोलिस ठाणे हद्दीतील पान टपऱ्यांवर पोलिसांनी छापे टाकून बेकायदेशीर गुंगीकारक पदार्थ, तंबाखूजन्य व इतर तंबाखू उत्पादने विक्री प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने तपासणी केली. सोळा जणांविरोधात पान मसाला व गुटखा विक्रीस प्रतिबंध अधिनियम २००३ च्या कलम ६ ब २४ अन्वये कारवाई करून खटले दाखल करण्यात आले. इतर पानटपरी चालक व मालक यांना योग्य ती समज देण्यात आली.
वडगाव पोलिसांच्या पाच पथकांनी वडगाव बाजारपेठ, वडगाव-लोणावळा रस्ता, वडगाव-तळेगाव-चाकण रस्ता आदी ठिकाणच्या पान टपऱ्यांवर छापे टाकून तपासणी केली व दोषी आढळून आलेल्या सोळा टपरी चालकांविरोधात खटले दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले. इतर टपरी चालकांना समज दिली. कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, साहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पोलिस उपनिरीक्षक जाधवराव, साहाय्यक फौजदार अजित ननवरे, आशिष काळे, सचिन गायकवाड, किरण नांगरे, नितीन गार्डी, श्रीशैल कंटोळी, उमाजी मुंडे, प्रफुल्ल गोरे, प्रतीक केदारी, गणेश होळकर, किरण ढोले आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, पोलिसांनी शहरातील अवैध गावठी दारू अड्डे, गांजा विक्री व मटका अड्ड्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.