
वडगाव शेरी : वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विमाननगर, कल्याणीनगर, चंदननगर, नगर रस्ता, जुना मुंढवा रस्ता, खराडी युवा आयटी पार्क येथे बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. त्यामध्ये व्यावसायिकांनी फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमध्ये केलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यात साडेतीन हजार चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली, तर ६५ स्टॉल आणि साहित्य जप्त करण्यात आले.