#PuneMandai बंद मंडईची तीन वेळा डागडुजी

अमर सदाशिव शैला 
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे - वडगाव शेरी भागात उभारलेल्या दोन्ही मंडया सध्या बंद आहेत. 

पुण्यनगरी ओटा मार्केट मंडईचे उद्‌घाटन तत्कालीन केंद्रीय मंत्री शैलजा कुमारी यांच्या हस्ते २००९ मध्ये झाले. या मंडईतील गाळ्यांचे वितरणच झालेले नाही.

महापालिकेने या मंडईच्या डागडुजीचे काम आतापर्यंत तीन वेळा केले आहे. तरीही पावसाळ्यात छतातून पाणी गळत आहे. साईनाथ नगरमधील नथुराम भगत भाजी मार्केट या मंडईचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे मंडईच्या बांधकाम खर्चात वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

ओळखपत्र असतानाही पथारी व्यावसायिकांकडून अतिक्रमण विभाग कारवाईनंतर पाच हजार रुपयांचा दंड वसूल करत आहे. त्यामुळे व्यवसाय करणे अवघड बनल्याचे पथारी व्यावसायिकांनी "सकाळ'ला सांगितले. 

महापालिकेतर्फे गाळे वितरण करण्यासाठी ओळखपत्रधारक पथारी व्यावसायिकांकडून २०१३ मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न पथारीवाले विचारत आहेत. महापालिकेने आकारलेले भाडे देऊन गाळे घेण्यास पथारीवाले तयार आहेत, परंतु अद्यापही गाळ्यांच्या वितरणाबाबत महापालिकेने धोरण आखलेले नाही.

नथुराम भगत भाजी मार्केट ५२ गाळे (प्रस्तावित) 
पुण्यनगरी ओटा मार्केट १५२ गाळे

महापालिकेने गाळे उपलब्ध करून दिले नसल्याने आम्हाला रस्त्यावर बसण्याशिवाय पर्याय नाही. अतिक्रमण विभागाने पुनर्वसन करावे आणि त्यानंतर कारवाई करावी. 
- रोहिदास कांबळे, पथारी व्यावसायिक, वडगाव शेरी

Web Title: vadgaon sheri pune mandai condition