वडगाव शेरी - पुणे महानगरपालिकेने तब्बल सत्तर लाख रुपये खर्च करून केलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. रस्त्याचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे ठेकेदार आणि त्यावर लक्ष देणाऱ्या अधिकाऱ्यांचे पितळ यामुळे उघडे पडले आहे. या संपूर्ण रस्त्यावर सर्वत्र पसरलेली खडी आणि खड्डे यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.