आजपासून पान, तंबाखूचे संकलन

आजपासून पान, तंबाखूचे संकलन
Published on

लोगो : प्रश्न विडी कामगारांचा...

पान, तंबाखूचे आजपासून
विडी कामगारांना वाटप

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीकडे लक्ष; नोटिफिकेशनचा कारखानदारांचा आग्रह

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० ः विडी कामगार व कारखानदार वादावर तात्पुरता पडदा पडला आहे. त्यामुळे सोमवारी (ता. ३१) सकाळी ९ वाजता सर्व कारखान्यांत कामगारांना तेंदू पत्ता व तंबाखूचे वितरण केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय मध्यस्थी केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील पंधरवड्यापासून विडी कारखानदारांनी शासनाने घेतलेल्या किमान वेतनाच्या निर्णयास विरोध करण्यास सुरुवात केली. शासनाने जाहीर केलेले ३७९ रुपये किमान वेतन मान्य नसल्याचे कारखानदारांचे म्हणणे होते. सद्यःस्थितीत महाराष्ट्रात २४५ रुपये व तेलंगणात २३४ रुपये वेतन आहे. कर्नाटकात ३८२ रुपये दर आहे.
शासनाने लादलेले किमान वेतन नाकारून उघडपणे उद्योग तेलंगणात स्थलांतरित करण्याचा इशारा कारखानदारांनी दिला होता. तसेच लगेच कच्चा माल कामगारांना देणे बंद केले. विशेष म्हणजे द्विपक्षीय समितीमध्ये कामगार संघटनांसह विडी कारखानदारदेखील सहभागी होते. दोन्ही बाजूंचे लोक बैठकांमध्ये सहभागी असल्याने तोडगा हा सर्वसंमत मानला जात होता. पण कारखानदारांनी तो स्वीकारला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुढील आठवड्यात चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर किमान वेतनाचा नवा निर्णय घेतला जाणार आहे.
..........
चौकट
अंतिम नोटिफिकेशन आवश्यक
या वादात दोन्ही बाजूंचे समाधान होईल, असा तोडगा मुख्यमंत्र्यांनी काढायला हवा. त्यानंतर या निर्णयाचे अंतिम नोटिफिकेशन काढणे आवश्यक आहे. नोटिफिकेशनमधील वेतनाच्या आकड्यावर दरवर्षी महागाई भत्ता वाढवला जाईल. सध्या दिले जाणारे २४५ रुपये व शासनाने मंजूर केलेले ३७९ रुपये वेतन यांचा सुवर्णमध्य गाठला तर हा वाद मिटणे शक्य होणार आहे.
......
कोट
आमचा जीएसटी १० टक्क्यांनी कमी केल्यावर एक्साईज कर १ टक्क्यावरून १० टक्के केला. या निर्णयामुळे आम्हाला सवलत मिळालीच नाही. त्यामुळे किमान वेतन वाढवणे शक्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर नोटिफिकेशन निघाले तरच प्रश्न सुटेल.
- सुनील क्षत्रिय, खजिनदार, विडी कारखानदार संघ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com