esakal | वाघोलीतील वाघेश्वर मंदिर सकाळी सहा वाजल्यापासूनन दर्शनासाठी खुले
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

वाघोलीतील वाघेश्वर मंदिर सकाळी सहा वाजल्यापासूनन दर्शनासाठी खुले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली : वाघोलीतील वाघेश्वर मंदिर (Temple) सकाळी सहा वाजल्यापासूनन दर्शनासाठी खुले करण्यात आले. पाच महिन्यानंतर मंदिर खुले झाल्याने स्थानिक नागरिक दर्शनासाठी दाखल झाले. गाभाऱ्यात प्रवेश करते वेळी मास्कची (Mask) सक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी बुधवारी मंदिरात साफसफाई तसेच सर्वत्र सॅनिटायझेशन करण्यात आले.

सकाळी 6 ते 12 व सायंकाळी 5 ते 9 या वेळेत मंदिर खुले राहणार. तर दुपारी 12 ते 5 या वेळेत मंदिर बंद राहणार आहे. अशी माहिती वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव यांनी दिली. नवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिरे खुली झाल्याने भाविकांनी शासनाचे आभार मानले. वाघेश्वर मंदिर हे पेशवे कालीन जुने हेमाडपंती शैलीचे मंदिर असून मंदिराच्या बाजूला तळे आहे. मंदिर परिसरात उद्यान व सरदार पिलाजीराव जाधवराव यांची समाधी आहे.

हेही वाचा: श्रावण विशेष : भाविक, पर्यटकांसाठी माचणूरची भेट म्हणजे पर्वणीच

भाविक व पर्यटकांना आकर्षित करणारा मंदिर व सभोवतालचा परिसर आहे. दर सोमवारी मंदिरात गर्दी होते.

loading image
go to top