वैजापूर येथे मंगळवारी सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा !

वैजापूर येथे मंगळवारी सिंचन व  पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा !
Published on: 

वैजापूर येथे पाणी प्रश्‍नी
उद्या शेतकऱ्यांचा मोर्चा

- आधार शेतकरी जलदूत समितीचा पुढाकार
- रब्बीसाठी व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीन आवर्तनाची मागणी
- वैजापूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर देणार धडक

ॲग्रोवन वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर : रब्बी हंगामासाठी तीन व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीन आवर्तनाची मागणी करण्यासाठी वैजापूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर लाभधारक शेतकऱ्यांचा मंगळवारी (ता.२७) धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.आधार शेतकरी जलदूत समितीच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

यासंदर्भात आधार शेतकरी जलदूत समितीच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार, नांदूर मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे लाभक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कापूस, तूर, मोयाबीन, भूईमूग, बाजरी, जनावरांचा हिरवा चारा, आले, कांदा, ऊस, फळबागा आदी खरीप व रब्बी पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे.

नांदूर मधमेश्वर कालव्याच्या हक्काच्या धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असतानाही खरिपाचे आवर्तन देण्यात आले नाही. त्यामुळे पाण्याअभावी खरिपाचे पिके जळून गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.आता रब्बीच्या पिकांनाही पाणी देण्याबाबत अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. आजच्या घडीला नांदूर मधमेश्वर कालव्याचा धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असतानाही नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२० ऑक्टोंबरपर्यंत रब्बीच्या सिंचनासाठी ३ आवर्तने व उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याकरता ३ आवर्तने याबाबत नियोजन करून लवकरात लवकर पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात यावे. तसे नियोजन न झाल्यास लाभधारक शेतकऱ्यांच्यावतीने मंगळवारी (ता.२७) सकाळी ११ वाजता वैजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही मागण्यासंदर्भात कोणतीही पावले उचलल्या न गेल्याने हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आधार शेतकरी जलदूत समितीचे प्रमुख पंडित शिंदे, महिला प्रमुख मंदा न्हावले, संपर्क प्रमुख सोन्याबापू शिरसाठ, युवा प्रमुख तन्मय कांबळे, महिला संपर्क प्रमुख मनिषा वारे,महिला युवा प्रमुख वैशाली सवाई,अनिता शेषराव चोभे आदींच्या स्वाक्षरीनिशी दिलेल्या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com