वैराग स्मशानभूमी निकृष्ट कामावरून ठेकेदाराला नोटीस , चांगल्या दर्जाच्या कामाचे आश्वासन
PNE26W01242, PNE26W01251, PNE26W01252
वैराग (ता. बार्शी) : स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधताना एकाच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने तीन कॉलम घेतलेले दिसत आहे. (दुसऱ्या छायाचित्रात) खाली आवश्यक तो पाया न घेताच मातीवर वीटकाम सुरू केल्याचे दिसत आहे. (तिसऱ्या छायाचित्रात) बांधकामासाठी येत असलेली माती मिश्रित कृत्रिम वाळू.
वैरागमधील ‘वैकुंठधाम’ कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांची पाहणी; त्रुटी दुरुस्त करण्याचे दिले आदेश
सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. ६ : येथील संत तुकाराम वैकुंठधाम स्मशानभूमीचे सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या निधीतून पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी रविवारी (१ मार्च) केला होता. या आरोपांमुळे वैरागमध्ये वातावरण तापले होते.
या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी ४ मार्च रोजी प्रत्यक्ष स्थळी जाऊन कामाची पाहणी केली. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून काम चांगल्या दर्जाचे करून घेतले जाईल, असे नगरपंचायतीच्या वतीने आश्वासन देण्यात आले.
वैराग शहरातील नागरिकांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्याचा संत तुकाराम वैकुंठधाम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांना स्वच्छ व सुसज्ज परिसर तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या ठिकाणी विविध सोयी उभारल्या जात आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी विरोधी गटातील माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्यक्ष स्मशानभूमीत सुरू असलेल्या कामातील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला होता.
वैकुंठधामच्या सुरवातीच्या टप्प्यातील बांधकामातील काही बाबींवर प्रश्न उपस्थित करत कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी प्रत्यक्ष स्मशानभूमीत जाऊन बांधकामाची पाहणी केली. संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप चुकीचा असला तरी काही ठिकाणी तांत्रिक त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. त्या तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले असून, संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---
चौकट
सुशोभीकरणासह अनेक कामे प्रस्तावित
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या स्मशानभूमीत प्रशस्त अंत्यसंस्कार मंच, पावसाळ्यात अडचण येऊ नये म्हणून शेड, बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह तसेच परिसराचे सुशोभीकरण अशा अनेक सुविधा प्रस्तावित आहेत.
---
कोट
बुधवारी (४ मार्च) संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावली आहे. कामातील त्रुटी सांगून अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करून घेतले जाईल. त्याशिवाय अंतिम बिल अदा केले जाणार नाही.
- योगीराज खुसपे, नगर अभियंता
---
चौकट
दर्जेदार कामांची सर्वसामान्यांची अपेक्षा
वैरागमध्ये ५ ते ६ ठिकाणी विविध समाजांसाठी स्मशानभूमी आहेत. मात्र अनेक ठिकाणी त्यांची दुरवस्था झालेली आहे. विशेषतः पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नव्याने उभारल्या जाणाऱ्या स्मशानभूमीतील कामे दर्जेदार व सुविधायुक्त असावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

