
पुणे - विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी चुकीच्या पद्धतीने सुशील हगवणेला पिस्तुलला परवाना मिळवून दिल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. त्याची तपासणी सुरु आहे. जर तथ्य आढळले तर सुपेकर यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणात कोणालाही दबाव आणू देणार नाही आणि कोणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.