
Pune Crime News: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात त्यांची सासू लता, नणंद करिष्मा आणि पती शशांक यांचे मोबाईल नीलेश चव्हाणकडून जप्त करण्यात आले आहेत. नीलेश चव्हाण व इतर आरोपींमध्ये मोबाईलच्या माध्यमातून झालेले संभाषण व मेसेज याचा तपास सुरु आहे. तसेच चव्हाण याने इतर आरोपींना गुन्हा करण्यासाठी अपप्रेरणा तसेच चिथावणी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी (ता. ३) न्यायालयाला दिली.