
Rajendra Hagawane: सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे केसची सुनावणी शिवाजीनगर कोर्टात झाली. या सुनावणीसाठी वैष्णवीचा सासरा राजेंद्र, पती शशांक, दीर सुशील, सासू लता, नणंद करिष्णा या पाचही आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर केलं होतं. यावेळी आरोपींच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले, त्यावरुन कोर्टरुममध्ये मृत्यूपश्चात वैष्णवीचं चारित्र्यहनन सुरु असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं.