
पुणे : हगवणे कुटुंबास शस्त्रपरवाना देण्याच्या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक (तुरुंग प्रशासन व कारागृह) डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. दरम्यान, डॉ.सुपेकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत संबंधितांना शस्त्रपरवाना मी नव्हे तर, तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील समितीने दिलेला असल्याचे स्पष्ट केले आहे.