Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवणारा; नीलेश चव्हाण अद्याप पसार
Pune News : वैष्णवी हगवणे यांच्या बाळाच्या ताब्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुल दाखवून धमकी दिल्याप्रकरणी आरोपी नीलेश चव्हाण अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरु असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) हा अद्याप पसार आहे.