
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासात दररोज नव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. तिचा नवरा शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्यावर आता आणखी गंभीर आरोप उघडकीस आले आहेत. सध्या येरवडा कारागृहात असलेल्या या दोघांवर आता म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नव्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.