
Pune Maratha samaj: पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील बांधवाची पुण्यात महत्वाची बैठक शांताई हॉटेलमध्ये पार पडली. मराठा समाजाच्या लग्न सोहळ्यात पार पडणाऱ्या प्रथा-परंपरा यावर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मराठा समाजाचे नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये लग्नसोहळ्याच्या संबंधाने सामाजिक आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे.