
पुणे - वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील या हगवणे बंधूनी त्यांची आई लता आणि बहिण करिष्मा यांचे मोबाईल या गुन्ह्यातील फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकता, अशी माहिती पोलिसांनी आज न्यायालयास दिली.