
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश चव्हाणला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून ताब्यात घेतले आहे. गेल्या दहा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला 30 मे रोजी रात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यावर पहाटे चार वाजता त्याला बावधन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आज सकाळी दहा वाजता त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.