

Nilesh Chavan: वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या दहा महिन्यांच्या बाळाचा बेकायदेशीररित्या ताबा घेतल्यानंतर निलेश चव्हाणवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे तो फरार होता. पोलिसांनी शुक्रवारी त्याला नेपाळ बॉर्डरवरुन ताब्यात घेतलं. शनिवारी त्याला कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.