
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भूकूम गावात घडलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या हलगर्जीपणाचे आणि राजकीय दबावाचे गंभीर आरोप समोर येत आहेत. विशेषतः, वैष्णवीच्या सासरच्या कुटुंबातील मोठी सून मयुरी हगवणे यांनी केलेल्या मारहाणीच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सात महिन्यांनंतरही या तक्रारीवर कोणतेही ठोस दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालेले नाही, ज्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.