
Rajendra Hagawane Latest News: पुण्यातल्या मुळशी तालुक्यातील भुकूम येथील राजेंद्र हगवणे यांचं कुटुंबिय सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण त्यांची धाकटी सून वैष्णवी हिने सासरच्या छळाला कंटाळून आपला जीव दिला. विशेष म्हणजे वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यामुळे ही खरंच आत्महत्या आहे का? असा प्रश्न पोलिसांना आहे.