
Pune Vaishnavi Case Latest Updates: वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार होते. शुक्रवारी पहाटे पोलिसांनी या दोघांना अटक केली. बावधन पोलिस ठाण्यामध्ये पत्रकारांनी राजेंद्र हगवणेंशी बोलण्याचा प्रयत्न केला.
राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबियांच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती आहे. हगवणे कुटुंबिय वैष्णवीचा अनन्वित छळ केल्याचं डिजिटल पुराव्यांवरुन स्पष्ट होत आहे. त्यातच वैष्णवीच्या मृतदेहावर मारहाणीच्या जखमा आढळून आलेल्या आहेत.