
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भूकूम गावात घडलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने 16 मे 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
वैष्णवी शशांक हगवणे यांच्या मृत्यूमागे सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेला मानसिक आणि शारीरिक छळ कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणात आता राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेने, मयूरी हगवणेने, धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे.