
Pune Crime News: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोथरूड आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलीस आज (मंगळवारी) न्यायालयात त्यांचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज करणार आहेत.