
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने पुणे शहरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी आज (28 मे) संपत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आज दुपारी दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करणार असून, त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत.
याप्रकरणी आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासोबतच, सुशील आणि शशांक हगवणे यांच्याकडे असलेल्या पिस्तूल परवाण्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुणे पोलिसांनी याची सखोल चौकशी सुरू केली आहे.