
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा सामाजिक आणि प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ माजवली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असून, आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी पूनम सुपेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या लग्नातील रुखवत पूनम सुपेकर यांनी तयार केला होता आणि त्यासाठी त्यांनी कस्पटे कुटुंबाकडून 1 लाख 50 हजार रुपये घेतल्याचा दावा दामनिया यांनी केला आहे. या आरोपांमुळे समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.