
पुणे - वैष्णवी हगवणे याचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशीही त्यांना सासरच्यांकडून मारहाण झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार वैष्णवी यांच्या अंगावर एकूण २९ जखमा आढळल्या असून, त्यातील १५ जखमा या मृत्यूच्या चोवीस तासाच्या आतील आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.