
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली असून, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कारागृह महानिरीक्षक (IG) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी या प्रकरणातील आरोपींना संरक्षण दिल्याचा आणि पीडित कुटुंबाला धमकावल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणाने जनतेचा रोष वाढला असून, सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरत आहे.