
पुण्यातील मुलशी तालुक्यातील भूकुम गावात घडलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तत्काळ अटक करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.